Gold-Silver Price: मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह भारतातील प्रमुख शहरातील आजचे सोने-चांदी दर
Gold Rate | Photo Credits: Pixabay.com)

सोने चांदी (Gold-Silver Price) बाजारात आज (29, सप्टेंबर 2021) काहीसा वधार पाहायला मिळाला. तर चांदी काहीशी झाकोळल्याचे पाहायला मिळाले. आंतररष्ट्रीय बुलीयन मार्केटमध्ये झालेल्या किंमत वाढीमुळे भारतातही सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्यूचर 0.04% तेजीसह 45,870 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या पातळीवर होता. तर, सिल्वर फ्यूचरमध्ये 0.22% घसरण पाहायला मिळाली. हा दर प्रति किलो 60,330 रुपये प्रति किलो इतक्या पातळीवर होता.

सोने दराबाबतत GoldPrice.org वर पाहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 11.57 वर MCX वर गोल्डमध्ये 0.15% तेजी पाहायला मिळत आहे. तर सोने 1737.91 डॉलर प्रति औंस इतक्या पातळीवर ट्रेड करत होता. चांदी 0.90% घसरणीसह 22.29 डॉलर प्रति औंस होता. Good Returns वेबासईटने दिलेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 1 ग्रॅम 4,603, 8 ग्रॅम सोन्याची किंमत 36,824, 10 ग्रँम सोन्याची किंमत 46,030 आणि 100 ग्रॅम सोन्याची किंमत 4,60,300 रुपये. 10 ग्रँम 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,030 इतकी राहिली आहे. (हेही वाचा, 7th Pay Commission: मोदी सरकारकडून पेंन्शनच्या 'या' नियमात बदल, आता मिळणार अधिक फायदा)

देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली

22 कॅरेट 45,340

24 कॅरेट49,470

मुंबई

22 कॅरेट-45,030

24 कॅरेट- 46,030

कोलकाता

22 कॅरेट-45,590

24 कॅरेट-48,290

चेन्नई

22 कॅरेट-43,500

24 कॅरेट-47,460

चांदी दराबाबत बोलायचे तर चांदी प्रति किलो 60,450 रुपए दराने विकली जात आहे. दिल्लीमध्ये चांदी 60,450 रुपए प्रति किलो दराने तर मुंबई आणि कोलाता येथेही चांदी 60,450 दारने विकली जात आहे. चेन्नईत मात्र चांदी 64,800 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे.