Gold Price Today: सोने दर घसरले, पाहा भारतातील प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव
Gold Silver Price | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने (Gold Price) दरात आज किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे. मल्टीपल कमॉडिटी एक्सचेंज (MCX) च्या माहितीनुसार सोने दर आज प्रति 10 ग्रँम 47,194 रुपयांनी (24 कॅरट) विकले जात आहे. तर चांदी दर (Silver Prices) प्रति किलो 70,880 रुपये दराने विकले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदी दरात (Gold Price Today) मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच सोने-चांदी दरात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन मध्ये अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला. अशा काळात सोने-चांदी दरांनी मात्र उसळी घेतली होती. जवळपास प्रति 10 ग्रॅम 30 ते 34 हजार रुपये दरांनी असलेले सोने चक्क 52,000 रुपये प्रती 10 ग्रॅम इतक्या दराने विकले गेले. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर लागून राहिल आहे.

भारतातील काही प्रमुख शहरांमधील सोने दर (24K) खालील प्रमाणे. (आकडेवारी बिजनेस वेबसाइट गुड रिटर्न्स वेबसाईट अन्वये)

भारतातील सर्व प्रमुख शहरांमधील प्रति 10 ग्रॅम सोने दर पुढील प्रमाणे, चेन्नई 48, 570 रुपए, मुंबई- 45, 570 रुपए, नवी दिल्ली- 49,980 रुपए, कोलकाता- 49,310 रुपए, बैंगलुरू- 48,220 रुपए, हैदराबाद- 48,220 रुपए, केरळ 48,220 रुपए, अहमदाबाद- 48,730 रुपए, लखनऊ-49, 980 रुपए, पटना- 45,570 रुपए, नागपूर- 45,570 रुपए, विशाखापट्टनम,48,220 रुपए

दरम्यान, भारतातील सर्व प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट (22K) सोने दर पुढील प्रमाणे, सर्व दर प्रति 10 ग्रॅम नुसार, चेन्नई- 44,520 रुपए, मुंबई- 44,570 रुपए, नवी दिल्ली- 45780 रुपए, कोलकाता- 46,520 रुपए, बैंगलुरू- 44,200 रुपए, हैदराबाद- 44,200, केरळ- 44,200 रुपए, अहमदाबाद- 46,730 रुपए, लखनऊ- 45780 रुपए, पटना- 44570 रुपए, नागपूर- 44570 रुपए, विशाखापट्टनम- 44,200 रुपए.