Gold Price Today: मुंबई, दिल्ली, कोरकाता, चेन्नहीसह भारतातील प्रमुख शहरांतील सोने-चांदी दर घ्या जाणून
Gold-Silver Price | Photo Credits: Pixabay.com)

सोने, चांदी दर (Gold Price Today) आज कसा आहे? हा प्रत्येकासाठी परिचयाचा प्रश्न. देशभरातील असंख्य नागरिक, गुंतवणुकदार आणि व्यावसायिक सोने-चांदी दरांबाब सतर्क असतात. त्यामुळे इथे आम्ही आजचे (2 मे 2021) सोने,चांदी दर (Gold Silver Today's Rate) देत आहोत. हे दर गुड रिटर्न्स संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 1 ग्रॅमचा दर 4,690 इतका आहे. कालच्या तुलनेत हा दर 20 रुपयांनी वधारला आहे. तर त्याच तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा दर हाही 20 रुपयांनी वाढून तो प्रति 1 ग्रॅम 4,790 इतका झाला आहे. चांदी दरातही (Silver Rate) काही प्रमाणात वाढ झाली आहे.

दरम्यान, सोने चांदी दरा राष्ट्रीय पातळीवर शहरानुसार विविधता आढळून येते. आजही सोन्याच्या भावात देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंमतींमध्ये निरनिराळी वाढ दिसून आली. जर देशभरातील ग्राहक जर सोने बुधवारी खालील शहरांमध्ये विकत घेण्याच्या विचारात असतील तर जाणून घ्या ही खरेदी तुम्हाला किती रुपयांना पडू शकेल? (हेही वाचा, Sovereign Gold Bond Scheme: 2021-22 वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमची पहिली विक्री आजपासून; जाणून घ्या दर काय?)

देशभरातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम नुसार)

दिल्ली

  • 22 कॅरेट- 46,980 रुपये
  • 24 कॅरेट- 50,98 रुपये

मुंबई

  • 22 कॅरेट- 46,900 रुपये
  • 24 कॅरेट- 47,900 रुपये

कोलकाता

  • 22 कॅरेट- 48,490 रुपये
  • 24 कॅरेट- 50,970 रुपये

चेन्नई

  • 22 कॅरेट- 46,390 रुपये
  • 24 कॅरेट- 50,600 रुपये

दरम्यान, आंतरराष्ट्रीय सोने बाजारात यूस सोने बाजारपेठेत सोने दर 0.11% वाढून तो 1,903.20 डॉलर इतका झाला.

सोन्याप्रमाणेच चांदी दरातही बुधवारी काहीशी वाढ पाहायला मिळाली. दिल्ली, केरळ, लखनऊ, पुणे, जयपूर, वडोदरा, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा दर प्रति किलो 72,600 रुपये पाहायाल मिळाला. तर चेन्नई, मदुराई, कोयंबटूर, विजयवाडा आणि हैदराबाद येथे चांदी प्रति किलो 77,300 रुपये दराने विकली जात आहे.