भारतात गेल्या 10 महिन्यात सोन्याच्या मागणीत 9 टक्के घट
Jewellery (Photo Credits: Pixabay)

देशात सोन्याची आयात ही सुरु असलेल्या आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारी दरम्यान जवळजवळ 9 टक्क्यांनी घटली असून 24.36 अरब डॉलरवर आली आहे. कॉमर्स मिनिस्ट्री यांच्या आकडेवारीनुसार, यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये याच काळात मूल्यवान धातूची आयात 27 अरब डॉलर होती. सोन्याची आयात कमी झाल्याने व्यापारात तुट कमी होऊन एप्रिल-जानेवारी दरम्यान 133.27 अरब डॉलर राहिली आहे. तर एका वर्षापूर्वी ती 163.27 अरब डॉलर होती. पिवळ्या धातुच्या आयातीत गेल्या वर्षात जुलै महिन्यापासून घट होत आहे. गेल्या वर्षात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात यामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात 4 टक्के आणि या वर्षात जानेवारी महिन्यात 31.5 टक्के घट झाली आहे.

भारतात सर्वाधिक सोन्याची आयात केली जाते. मुख्यत्वे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते. देशात वर्षासाठी 800 ते 900 टन सोन्याची आयात होते. सोन्याच्या आयातीतील व्यापार तूट आणि चालू खात्यातील तूट यावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी सरकारने धातूवरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.(31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा)

उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा असा दावा आहे की या क्षेत्रामध्ये कार्यरत युनिट्स जास्त दरांमुळे शेजारच्या देशात आपला उत्पादन बेस स्थापित करीत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी दरम्यान रत्ने व दागिन्यांची निर्यात 1.45 टक्क्यांनी घसरून 25.11 अब्ज डॉलरवर गेली. देशाची सोन्याची आयात 2018-19 मध्ये सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 32.8 अब्ज डॉलरवर गेली आहे.