गोव्यात आज कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 79 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना व्हायसरने थैमान घातल्याने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम ठेवले आहेत.परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात Phase नुसार नियमात शिथीलता आणण्यात येणार आहेत. याच दरम्यान आता गोव्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून आज येथे 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गोव्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 79 वर पोहचला आहे. त्यापैकी 22 अॅक्टिव्ह रुग्ण असून 57 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती गोवा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गोव्यात अचानकपणे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनामुळे खळबळ उडाली होती. सध्या गोव्यात 60 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गोव्यात सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. प्रमोद सावंत यांनी असे ही म्हटले आहे की, मंत्रिमंडाळाच्या बैठकीनंतर काही गोष्टीसंदर्भातील सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहेत. यापूर्वी गोव्यात जिम सुरु करण्यात यावे असे नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.(गोव्यात राज्याअंतर्गत वाहतूकीला बंदी पण केंद्राने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमात शिथीलता- मुख्यमंत्री प्रमोद सावंत)

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 198706 वर पोहचला असून 5598 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत 97581 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 95527 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या धक्कादायक असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री 9 ते 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.