महाराष्ट्रापाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशातही एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली. प्लास्टिक वापरामुळे होणारी निसर्गाची हानी हा विचार लक्षात घेऊनच ही बंदी लागू करण्यात आली होती. याचंच पुढचं पॉल म्हणजे ओडिशा सरकारने सुरु केलेला एक नवा उपक्रम.
ओडिशा सरकारच्या या स्तुत्य उपक्रमांतर्गत एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात गरीब व्यक्तींना मोफत जेवण देण्याचे ठरवले आहे. ओडिशामधील कोरापुट जिल्हातील कोटापड अधिसूचित मंडळाच्या अखत्यारीत ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेनुसार जी व्यक्ती प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कप यांचा एक किलो कचरा आणून देईल त्यांना मोफत जेवण देण्यात येत आहे.
ओडिशा राज्य सरकारच्या आधार योजनेत हा नवा उपक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या आहार योजनेअंतर्गत शहरी भागातील गरिबांना भात व डाळमा ( भाजी- वरण) असा आहार पाच रुपयात उपलब्ध आहे. पण या नव्या स्कीममुळे आता जे लोक 1 किलो प्लास्टिक कचरा आणून देतील त्यांना मोफत जेवण दिले जाणार आहे.
या नव्या स्कीमची माहिती देणारे फलक सर्वत्र लावण्यात आले असून आधार केंद्रावर त्यासाठी खास काउंटर देखील सुरू करण्यात आले आहे.
धक्कादायक! तामिळनाडूमध्ये शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून काढले 52 किलो प्लास्टिक
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे गटारे तुंबतात, तसेच पक्षी व प्राण्यांसाठी देखील प्लास्टिक घटक ठरते. आणि या नव्या स्कीममुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखणे हे एकमेव उद्देश आहे.