तमिळनाडूला गाजा वादळाचा मोठा फटका
गाजा वादळ ( फोटो सौजन्य - ANI )

तमिळनाडूच्या किनाऱ्यावर गाजा वादळ येण्याची गुरुवारी शक्यता बाळगली जात होती. तसेच या वादळामुळे तमिळनाडूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारासुद्धा देण्यात आला होता. मात्र अखेर तमिळनाडूत गाजा वादळ येऊन आपटल्यामुळे तेथील नागरिकांना या वादळामुळे मोठा फटका बसला आहे.

गुरुवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार गाजा वादळ हे चेन्नईपासून 380 किमी दूर आले असल्याचे वृत्त समोर येत होते. तसेच या वादळमुळे तेथे वेगाने वारे वाहत असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र अखेर तमिळनाडूत गाजा वादळ दाखल झाले. या वादळामुळे नागापट्टीनप येथे प्रचंड जोरजार पाऊस पडून तेथील झाडे आणि अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. तर 76,000 नागरिकांना सुरक्षित घटनास्थळी हलविण्यात आले आहे.

तर या वादळाला सामना करण्यासाठी नौसेना सज्ज झाली होती. तसेच मच्छिमारांना ही समुद्रातून लवकर बाहेर येण्यास सांगण्यात आले होते.