Kiss करण्यास नकार दिला म्हणून मित्राने केली 18 वर्षीय विद्यार्थिनीची हत्या
(संग्रहित प्रतिमा)

चुंबन घेण्यास नकार दिला म्हणून मित्राने 18 वर्षीय विद्यार्थिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. आरोपी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) जबलपूर येथील बिजापूर गावात घडली आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी आणि विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घरी परतताना ती आणि तिचा मित्र एका तलावाजवळ बसले होते. त्यावेळी त्याने तिच्याकडून चुंबनाची मागणी केली. मात्र विद्यार्थिनीने त्याला नकार दिला. तोच राग मनात ठेवून त्याने तिला जोरात धक्का दिला. त्या घटनेत विद्यार्थिनी जवळच्या दगडावर जाऊन आदळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 5 सप्टेंबरला घडली. त्यावेळी घाबरलेल्या या विद्यार्थ्याने तिचा मृतदेह पाला-पाचोळ्यात लपवून ठेवला आणि तेथून पळ काढला. 4 दिवसानंतर रस्त्याने जाणा-या स्थानिकांनी हा मृतदेह पाहिला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा- अमरावती: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने भिरकावला दगड; पीडिताच्या आईची पोलिसात धाव; रक्तबंबाळ तरुणावर ICU मध्ये उपचार

पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृत विद्यार्थिनीच्या कुटूंबियांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विद्यार्थीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.