दिल्ली येथे मेट्रो स्थानकात गोळीबार, दोन जण ठार
Shooting (Photo Credits: ANI | Representational Image)

नवी दिल्ली: दिल्लीच्या (Delhi)  द्वारका मेट्रो (Dwarka Metro Station) स्थानकाजवळ दोन गटांमध्ये काही कारणास्तव वाद होऊन गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या गोळीबारामध्ये एका कार चालकाला व प्रवाश्याला गंभीर जखम होऊन मृत्यू झाल्याचे लोकमतच्या प्राथमिक माहितीनुसार समोर येत आहे. मेट्रो परिसर हा दिल्लीत नेहमीच वर्दळीचा म्हणून ओळखला जातो, आणि त्यातही संध्याकाळची वेळ असल्याने स्थानकात प्रवाश्यांची गर्दीच्या होती, या दरम्यान दोन अज्ञात गटांमध्ये काहीश्या कारणाने भांडण सुरु झाले. यामुळे भांडणारे व भांडण बघणारे जमा होऊन एकाच ठिकाणी गर्दी झाली होती.

अखेरीस या दोन गटांमधील वाद इतका विकोपाला गेला की त्यातील दोन्ही गटांनी एकमेकांवर बंदूक रोखून गोळीबार करायला सुरवात केली.यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. लग्नासाठी रजा नाकारल्याने पोलीस कर्मचा-याने वरिष्ठावर झाडल्या १३ गोळ्या

या प्रसंगाची माहिती कळताच पोलिसांनी तिथे तात्काळ धाव घेतली मात्र हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणाखाली पोलिसांनी देखील गोळीबार केला.या संपूर्ण प्रसंगात एकूण 15 वेळा दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याचे समजत आहे.