Ex-Judge C S Karnan Arrested: चैन्नई पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी माजी न्यायधीश सी. एस कर्णन यांना अटक
त्यांच्यावर सोशल मीडीयावर आक्षेपार्ह व्हिडिओ सातत्याने अपलोड केल्याचे आरोप आहेत.
चैन्नई पोलिसांकडून आज (2 डिसेंबर) माजी न्यायाधीश सी. एस कर्णन (C S Karnan) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर सोशल मीडीयावर आक्षेपार्ह व्हिडिओ सातत्याने अपलोड केल्याचे आरोप आहेत. तसेच ते न्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह भाषेत बोलणं, त्यांच्या पत्नींना बलात्काराच्या धमक्या देणं असे आरोप देखील लावले आहेत. The Central Crime Branch of Chennai आज त्यांना ताब्यात घेतले आहे. C S Karnan हे
मद्रास आणि कलकत्ता हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते.
मद्रास उच्च न्यायालयाने काल Director General of Police and Chennai Police Commissioner यांना 7 डिसेंबरपूर्वी कोर्टासमोर हजर राहून संबंधित प्रकरणाची माहिती देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान मद्रास हायकोर्टाने चैन्नई पोलिस कमिशनर यांना कर्णन यांच्या विरोधात तपासाची जबाबदारी दिली होती. तसेच डीजीपी यांना पर्यवेक्षण करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते.
Tweet
Bar Council of Tamil Nadu कडून याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यामध्ये महिला कर्मचार्यांबद्दल ते आक्षेपार्ह टीका-टिपण्णी करत असल्याच्या तसेच वकिलांच्या, न्यायाधीशांच्या पत्नींबाबत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट्स करणं, त्यांना बलात्कारांच्या धमक्या देणं असे अतिगंभीर आरोप आहेत.