नोकरी पाहात आहात? शिक्षण फक्त ग्रॅज्युएट हवे, मिळणार 44,990 रुपये पगाराची नोकरी
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संस्थेमध्ये नोकरीभरती सुरु करण्यात आली आहे. तर EPFO असिस्टंट पदासाठी ही नोकरी भरती असणार आहे.

या नोकरीभरतीसाठी 30 मे पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार असून 25 जून ही अंतिम तारीख असणार आहे. तर अर्जदारांना epfindia.gov.in या संकेस्थळावर अधिक माहितीसह अर्ज भरता येणार आहे. EPFO असिस्टंटसाठी 280 रिक्त पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे.

(आनंदाची बातमी: नवे सरकार सत्तेत आल्यावर 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, मिळणार ज्यादा भत्ते)

मात्र अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण ग्रॅज्युएशन झालेले असायला हवे. त्याचसोबत वयाची अट 20-17 वर्ष असावे. अर्जदारांना यासाठी शुल्क स्विकारले जाणार असून एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी 200 रुपये आकारले जाणार आहेत. तर खुल्या वर्गासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. त्यानंतर निवडण झालेल्या उमेदवाराला 44,990 रुपये पगार असणार आहे.