ECI Halts 'Viksit Bharat' WhatsApp Message: पीएम मोदींचे 'विकसित भारत' व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणं तातडीने थांबवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश; MeitY कडून मागवला अहवाल
आयटी मंत्रालयाचे म्हणणे आहे की आचारसंहितेपूर्वीच मेसेज पाठवला असून काही ठिकाणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे तो काहींना उशिरा मिळत आहे.
सध्या अनेकांना त्यांच्या व्हॉट्सअॅप वर 'Viksit Bharat' WhatsApp Message आले आहेत. ज्यात पंतप्रधानांचं एक पत्र पीडीएफ स्वरूपात आहे. मात्र देशात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागली आहे. हा मेसेज त्याचा भंग करणारा आहे असं सांगत अनेकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. यावर निवडणूक आयोगाने आयटी मंत्रालयाकडून आता हे मेसेज पाठवणं थांबवण्यास सांगितलं असून तातडीने अहवाल देखील मागवला आहे. दरम्यान आयटी मंत्रालयाचे म्हणणे आहे की आचारसंहितेपूर्वीच मेसेज पाठवला असून काही ठिकाणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे तो काहींना उशिरा मिळत आहे.
भारत सरकारच्या प्रमुख योजनांचे मूल्यमापन आणि अंमलबजावणी तसेच वितरणामध्ये सुधारणा करण्यासाठी 'Viksit Bharat' सुरू असलेला उपक्रम आहे. असे त्यांनी बायो मध्ये लिहलं आहे. एका व्हेरिफाईड बिझनेस अकाऊंट वरून भारतीयांना त्यांच्या व्हॉट्सअॅप वर हा मेसेज मिळत आहे. नक्की वाचा: Viksit Bharat Sampark WhatsApp Message खरा की खोटा? जाणून घ्या 'Letter From Prime Minister' अधिकृत नंबर वरूनच पाठवलं आहे हे कसं तपासाल?
व्हॉट्सॲपवर विकसित भारत संपर्कचा मेसेज मिळाल्यानंतर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला होता तसेच हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हटलं होतं. सरकार अनधिकृतपणे कोणत्या डेटाबेसमध्ये प्रवेश करत आहेत?' असा सवाल मनीष तिवारी यांनी X म्हणजेच पूर्वीच्या ट्वीटर वर पोस्ट करत विचारला होता.