Dubai Building Fire: दुबई येथे इमारतीला आग, केरळीय दाम्पत्यासह 16 जणांचा मृत्यू
Aurangabad Fire (PC - File Image)

दुबई येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत (Dubai Building Fire) मूळच्या केरळ (Kerala) येथील दाम्पत्यासह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुर हे दाम्पत्य केरळ येथील मलप्पुरम जिल्ह्यातील आहे. दाम्पत्यातील पुरुषाचे नाव कलंगदन रिजेश आणि महिलेचे नाव कंदमंगलत जिशी असे आहे. दोघेही अनुक्रमे 38 आणि 32 वर्षे वयाचे आहेत. दोघेही मुलप्पुरम येथील वेंगारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काही कामानिमित्त ते दुबईला वास्तव्यास होते. दरम्यान, या दाम्पत्यासोबत असलेले मृत हे पाकिस्तानातील असल्याचे समजते. याशिवाय बचाव कार्यात सहभागी झालेल्या सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेतील केरळीय मृत रिजेश हा प्रवासी कर्मचारी म्हणून कार्यकरत होता. तर जिशी नामक महिला खिजाईस क्रिसेंट स्कूलमध्ये शिक्षक होती. दुबईतील वर्दळीच्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या नायफच्या फ्रिजमुरार भागातील एका इमारतीत लागलेल्या आगीदरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. रिजेशच्या वडिलांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार रिजेश आणि जिशी या दोघांचेही मृतदेह उद्यापर्यंत त्यांच्या मूळ गावी पोहोचणे अपेक्षीत आहे. (हेही वाचा, Minhad District renames as Hind City: अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव बदलून हिंद शहर ठेवले, UAE सरकारचा महत्त्वाचा निर्णय)

दुबई हे पर्शियन गल्फच्या आग्नेय किनार्‍यावर वसलेले संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एक शहर आहे. हे UAE मधील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे, ज्याची लोकसंख्या 3 दशलक्ष पेक्षा जास्त आहे. दुबई हे आधुनिक वास्तुकला, लक्झरी शॉपिंग आणि नाइटलाइफसाठी ओळखले जाते. हे जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा आणि पाम जुमेराह, पाम वृक्षासारखे कृत्रिम बेट यांसारख्या अनेक घटकांसाठी प्रसिद्ध आहे.

शहराची अर्थव्यवस्था पर्यटन, रिअल इस्टेट आणि आर्थिक सेवांद्वारे चालविली जाते. दुबई हे जागतिक व्यापार केंद्र बनले आहे, जे जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योजकांना आकर्षित करते. परदेशी कामगारांची मोठी लोकसंख्या असलेले हे प्रवासी लोकांसाठी देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे.

दुबईमध्ये पारंपारिक अरब आणि आधुनिक पाश्चात्य प्रभावांचे मिश्रण असलेली वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. हे शहर आदरातिथ्य आणि सहिष्णुतेसाठी ओळखले जाते, विविध राष्ट्रीयता, धर्म आणि संस्कृतीतील लोकांचे स्वागत करते. दुबई शॉपिंग फेस्टिव्हल आणि दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांसाठीही हे शहर ओळखले जाते.