दिल्लीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे फोटो पोलिसांकडून जाहीर
दहशतवाद्यांचे फोटो जाहीर ( फोटो सौजन्य- दिल्ली पोलीस )

अमृतसरमध्ये दहशतवादी हल्ल्यापूर्वीच दिल्लीमध्ये ही हाय अलर्टची सूचना पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी धार्मिक कार्यक्रमात हा बॉम्ब स्फोट घडवून आणला. तर या दोन अज्ञात व्यक्ती दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र आता नवी दिल्लीमध्ये सुद्धा दहशतवादी घुसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

राजधानी नवी दिल्ली येथे दोन दहशतवादी घुसल्याचा संयश पोलिसांना आला आहे. त्यामुळे या दोन दहशतवाद्यांची छायाचित्रे जाहीर केली आहेत. तसेच या दोघांचे फोटो ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. जैश-ए-मोहम्मद संघटनेमधील हे दोघे असल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांना कोणी कुठेही पाहिले तर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

तसेच अमृतसरमध्ये झालेल्या ग्रेनेडचा वापर पाकिस्तानकडून करण्यात आला असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे वर्तविले जात आहे.