पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या 6 किमी ब्लू लाईनचे आज उद्घाटन होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या 6 किमी ब्लू लाईनचे आज उद्घाटन होणार (फोटो सौजन्य-ट्वीटर)

दिल्लीत (Delhi) शुक्रवार (8 मार्च) पासून ब्लू लाईन नोएडा सिटी सेंटर ते नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी कनेक्शन पर्यंतच्या मेट्रोची सुरुवात होणार आहे. या 6.6 किलोमीटरच्या लांबलचक मेट्रो लाईनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेट्रो प्राधिकरणाशी निगडीत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाईनच्या सुरक्षिततेबद्दल मंजूरी देण्यात येणार आहे.तसेच आजपासून सर्व नागरिकांसाठी या ब्लू लाईन मेट्रोची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मेट्रो रेल्वे सेफ्टी कमिशनर एस के पाठक यांनी 6.675 किमी लांब नोएडा सिटी सेंटर ते नोएडा इलेक्ट्रॉनिर सिटी सेक्शनसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. ही मेट्रो लाईन पूर्णपणे एलिवेटेड असणार असून सहा स्थानाकांवर थांबणार आहे. त्यामध्ये सेक्टर 34, सेक्टर 52, सेक्टर 61, सेक्टर 62 आणि नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी स्थानक मुख्य असणार आहे.

यासोबतच शुक्रवारी नरेंद्र मोदी 9.4 किमी दिलशाद गार्डन येथे नवीन बस स्थानकाचे उद्घाटन ही करणार आहेत. तर दिल्ली मेट्रोची जवळजवळ लांबी 327 किमी असून त्यामध्ये 236 स्टेशन आहेत.