Delhi: सुप्रीम कोर्टाच्या समोर महिलेसह पुरुषाने स्वत:ला पेटवत केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Delhi Supreme Court (Photo Credits-ANI)

Delhi: दिल्लीत तिलक मार्ग स्थिती सुप्रीम कोर्टासमोर एक महिला आणि पुरुषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेदरम्यान, तेथील उपस्थितीत असलेल्या वकिलांच्या मदतीने पीडित महिला-पुरुष यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे या दोघांवर उपचार सुरु आहेत. परंतु या दोघांनी आत्महत्या का केली यामागील कारण समोर आलेले नाही. या संपूर्ण घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरु करण्यात आला आहे. महिला आणि पुरुषाची ओळख पटलेली नाही. महिलेच्या तुलनेत पुरुष अधिक गंभीर आहे.(Punjab: पटियाला मध्ये कार ड्रायव्हरची पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक, कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद Watch Video)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या बाहेर सोमवारी अचानक एका महिला आणि पुरुषाने स्वत:ला पेटवत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याआधी दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडे पर्याप्त आयडी नसल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवले. परंतु त्यांना अडवल्याने स्वत:ला आग लावली. सध्या दोघे रुग्णालयात उपचार घेत आहेत.(Bihar: मुलं सतत रडतं म्हणून आईचा अजब प्रकार, बाळाच्या ओठांना फेविक्विक लावून चिटकवले ओठ)

Tweet:

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक बॉटल सुद्धा मिळाली आहे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, त्या बॉटेलमध्ये ज्वलनशील पदार्थ ते दोघे घेऊन आले होते. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.