'Cycle Girl' ज्योति कुमारी हिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मागील वर्षी सायकलवरुन आपल्या आजारी वडिलांना घेऊन आली होती गुड़गाव ते दरभंगा
Cycle Girl Jyoti Kumari (Photo Credits: twitter/ @rsprasad)

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभरात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यावेळी स्थलांतरित मजूरांना आपल्या घरी परत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान बिहारच्या ज्योति कुमारीने आपल्या आजारी वडिलांना गुड़गाव (Gurgaon) ते दरभंगा (Darbhanga) सायकलवरून आणले होते. तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मागील वर्षी ज्योति कुमारी (Jyoti Kumari) 'सायकल गर्ल' म्हणून प्रसिद्ध झाली होती. तिने आपल्या वडिलांना मोहन पासवान यांना 1200 किमीचा प्रवास सायकलने पार करुन घरी आणले होते.

ज्योतिचे घर दरभंगाच्या सिंहवाडा प्रखंडच्या सिरहुल्ली गावात आहेत. तिचे वडिल आपल्या कुटूंबासोबत राहत होते. आज त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ज्योति कुमारीच्या वडिलांच्या जाण्याने या गावात शोककळा पसरली आहे.हेदेखील वाचा- Lockdown Extension In Bihar: बिहार राज्यात लॉकडाऊन 8 जूनपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा

मागील वर्षी ज्योति कुमारी हिने दाखवलेल्या धाडसामुळे प्रचंड चर्चेत आली होती. गेल्या वर्षी लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे ठप्प झाली. अशा वेळी हातावर पोट असलेल्या स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला. मात्र ज्योति कुमारी हिचे वडिल आजारी असल्याने ते घरी जाऊ शकत नव्हते. अशा वेळी ज्योति कुमारी हिने हिंमत दाखवून आपल्या वडिलांना सायकलवरून गुड़गाववरुन दरभंग्याला राहत्या घरी सायकलवरुन आणले होते. 1200 किमीचा रस्ता सायकलवरुन पार करण्यासाठी तिला 8 दिवस लागले होते.

भारतातील कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगाना ही घटक राज्ये आणि काही काही केंद्र शासित प्रदेशांनी लॉकडाउन (Lockdown) कालावधी वाढवला आहे. यासोबतच उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर आदी राज्यांनी कोरोना व्हायरस संक्रमण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले आहेत. मात्र, या ठिकाणी रात्रीची संचारबंदी कायम असेल.