औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; अवकाळी पावसामुळे मक्याचे मोठे नुकसान
Aurangabad (Photo Credit: ANI)

अवकाळी पावसामुळे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कानडगाव (Kanadgaon) येथे शेतकऱ्यांनी लावलेल्या मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी दुखावला गेला आहे. या वर्षीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले असून अवकाळी पावसामुळे सोयाबीन, द्राक्ष, ज्वारी, भात यासारख्या अनेक पिकांचीही नासाडी झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवट झाला तरीदेखील पावसाच्या सरी कोसळतच आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील लोकही या वर्षीच्या पावसाला वैतागून गेले आहे. महत्वाचे म्हणजे, अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जाणार, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या पाच जिल्ह्यात 237 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, द्राक्ष, ज्वारी, भात या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. यात पुणे जिल्ह्यात 21 हजार 681 हेक्टर, सातारा 11 हजार 800 हेक्टर, सांगली 65 हजार 267 हेक्टर, सोलापूर 36 हजार 345, कोल्हापूरमध्ये 1 हजार 55 हेक्टर असे पाच जिल्ह्यात एकूण 1 लाख 36 हजार शेतीचे नुकसान झाले आहे. हे देखील वाचा- पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना: घरबसल्या पाहा तुम्हाला मिळणार का 6,000 रुपये?

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून तेथील शेतकऱ्यांना अधिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एएनआय वृत्त संस्थेने शेअर केलेल्या फोटोत औरंगाबाद येथील शेतकरी दुख व्यक्त करत असताना दिसत आहे. या पिकांसाठी केलेली मेहनत आणि पैसा दोन्ही पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी दुखावला आहे.