Covid-19 Pandemic: कोरोना व्हायरस नियंत्रणात; दिल्लीसह सात केंद्रशासीत राज्यांमध्ये कोविड 19 संसर्गामुळे 24 तासात एकही मृत्यू नाही
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus)  संकट नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या ताज्या आकेडवारीनुसार गेल्या 24 तासात 15 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एकाही कोरोना व्हायरस संक्रमित (Covid-19 Pandemic) व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. तर सात केंद्र शासित प्रदेशांमध्ये पाठिमागी तीन आठवड्यांमध्ये कोविड 19 महामारित एकही मृत्यू नाही. गेल्या पाच आठवड्यांच्या आकडेवारीवर नजर टाकता कोरोना व्हायरस संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये साधारण 55% इतकी घट झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, 9 फेब्रुवारीच्या सकाळी आठ वाजेपर्यंत 62.6 लाख लोकांना कोरोना व्हायरस लसीकरण करण्यात आले. यात 5,482,102 आरोग्य कर्मचारी, आणि अत्यावश्यक सेवेत असलेल्या 7,76,906 कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांन म्हटले की, गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे एकही मृत्यू नाही. ही एक चांगली बातमी आहे. परंतू, नागरिकांनी दळणवळनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे.

कोरोना व्हायरस लस ही व्यावसायिक रुपात उपलब्ध होऊ शकेल काय? असे विचारले असता डॉ. पॉल म्हणाले. देशातील 30 कोटी जनतेला कोरोना लसीकरण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यानंतर इतर सर्व पर्याय खुले होतील. दक्षिण अफ्रिकेतही कोरोना लसीवर काम सुरु आहे. ही लस प्रभावी असल्याची चर्चा आहे. यावर बोलतान पॉल म्हणाले आम्ही या लसीवरदेखील लक्ष ठेऊन आहोत. (हेही वाचा, Coronavirus: एका 'प्रोटीन'मुळे भारतासह आशियाई देशांपेक्षा पाश्चात्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक; संशोधनातून खुलासा, जाणून घ्या सविस्तर )

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पाच राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 81% इतकी राहिली. केरळ आणि महाराष्ट्रात देशाती सर्वाधीक 70% कोरोना रुग्ण आढळले. मंत्रालयाने सांगितले की 33 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये उपचार सुरु असलेल्या रिहिंग्यांची संख्या 5000 पेक्षा कमी आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णंची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.