Coronavirus: गेल्या वर्षी प्रमाणे भारत यंदाही जिकू शकतो कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई- पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेबाबत केंद्रीय अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक (PM Modi Review meeting on Corona घेतली. या बैठकीत देशातील कोरना व्हायरस लसीकरण मोहिमेची गती आणि इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी अनेक सूचना केल्या. या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या वर्षी प्रमाणे भारत यंदाही कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई जिंकू शकतो. आपण सर्व शक्तीनिशी प्रयत्न करायला हवेत.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली बैठक अशा काळात पार पडली आहे, ज्या काळात देशभरातील विविध राज्यांमधून वृत्त येत आहे की कोोरना लस पुरेशा प्रमाणात मिळत नाही. महाराष्ट्र, छत्तीसगड यांसारख्या अनेक राज्यांनी म्हटले आहे की, त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये कोरोना लस मिळत नाही. या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आरोप केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांना लावला फोन, मात्र समोरून मिळाले 'हे' उत्तर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी म्हटले की, कोरोना चाचणी (टेस्टींग) आणि ट्रीटमेंट याला कोणताही पर्याय नाही. त्यांनी कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्धघ करुण देण्यात यावेत. त्यासाठी अधिक प्रमाणात सोई वाढवण्यावर भर देण्यास सांगितले. लोकांच्या मनातील भीती आणि त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही सांगितले. प्रशासकीय उदासिनतेपासून अधिकाऱ्यांनी स्वत:ला आणि प्रशासनाला दूर ठेवायला पाहिजे असेही मोदी म्हणाले.

देशभरात रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लांट लावण्याचे काम वेगाने करण्यात यावे. त्यासोबतच कोरोना लस मोठ्या प्रमाणावर आणि पूर्ण क्षमतेने उपलब्ध करुन देण्याचेही आदेश मोदींनी या वेळी दिले. गेल्या वर्षी आपण कोरोनाला पराभूत केले होते. दुसऱ्यांदाही देश कोरोना व्हायरस संसर्गाला दूर ठेऊ शकतो. देश कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकतो. परंतू, त्यासाठी मुलभूत सिद्धांतानुसार काम करायला हवे असे पंतप्रधान म्हणाले.