Coronavirus: तब्बल 30 आमदार कोरोना व्हायरस संक्रमित, पंजाब विधानसभेची माहिती
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पंजाब (Punjab) राज्यातील एक.. दोन.. नव्हे तर तब्बल 30 आमदारांची कोरोना व्हायरस (Thirty MLAs Infected With Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पंजाब विधानसभेतील (Punjab Legislative Assembly) एकूण सदस्य संख्या 117 इतकी आहे. त्यापैकी तब्बल 25% आमदार कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित आढळले आहेत. देशातील एकूण राज्यांमध्ये असलेल्या विधानसभांपैकी इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार कोरोना संक्रमित आढळण्याची ही पहीलीच घटना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदारांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती पंजाब विधिमंडळाने गुरुवारी (27 ऑगस्ट) दिली आहे.

पंजाब विधानसभेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या एकूण 30 आमदारांपैकी 7 जण रुग्णालयात उपचार घेतल्यावर बरे झाले आहेत. मात्र, उर्वरीत आमदार अद्यापही कोरोना पॉझिटीव्ह आहेत. हे आमदार कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांना पंजाब विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. तसेच, या सर्व आमदारांना क्वारंटाइन राहावे लागणार आहे. (हेही वाचा, India's COVID19 Tally Crosses 33 Lakh Mark: चिंताजनक! भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 33 लाखांचा टप्पा; आतापर्यंत 60 हजार 472 मृत्यूची नोंद)

ग्रामीण विकासमंत्री तृप्त राजिंदर बाजवा हे पंजाबमील पहिले कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह मंत्री होते. त्यांनी वेळीच उपचार घेतल्याने आणि काही काळ क्वारंटीन राहिल्यानंतर ते पूर्ण बरे झाले. मंत्री बाजवा हे पुन्हा एकदा आपल्या कामावर परतले आहेत.

दरम्यान, तृप्त राजिंदर बाजवा यांच्यानंतर कारागृह मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा, महसूल मंत्री गुरप्रीत कांगर आणि उद्योग मंत्री श्याम सुंदर अरोडा यांचीही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी बुधवारी सांगीतले की, पंजाबमध्ये एकूण 117 आमदारांपैकी 23 जण आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत.