Coronavirus: शामली येथे कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णाची आत्महत्या
A man has committed suicide in quarantine ward of a hospital in Shamli (Photo Credits-ANI)

उत्तर प्रदेशातील (UP) शामली जिल्ह्यात कोरोना व्हायसरच्या संशयित रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये सदर व्यक्तीला ठेवण्यात आले असताना त्याने तेथेच आत्महत्या केली आहे. रुग्णाला 31 मार्चला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे परिररात खळबळ उडाली असून घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांस अन्य प्रशासकिय अधिकारी पोहचले आहेत.डीएम जसजीत कौर यांनी असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील कांधला क्षेत्रातील स्थानिक 40 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली होती. त्यानंतर त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्ण तणावाखाली गेला होता. मात्र आज सकाळी त्याने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.(Coronavirus: इंदोर येथे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांकडून दगडफेक; पाहा व्हिडिओ)

यापूर्वी सुद्धा सहारनपुर येथे सुद्धा कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी एका क्लर्कने ऑफिसातच फाशी घेत आयुष्य संपवले होते. बुधवारी युपी येथे कोरोना संक्रमित दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून भारतातील कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार 151 जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा 1965 वर पोहचला असून आता पर्यंत मृतांचा आकडा 50 च्या पार गेला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायसरसच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक डब्लूएचओ यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढे केले जात आहेत. ऐवढेच नाही तर हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी राज्यातून स्थलांतर न करता त्यांसाठी जेवणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व सोय करण्यात आली असल्याचा निर्णय ही सरकारकडून जाहिर  करण्यात आला आहे.