Rahul Gandhi Tests Positive For COVID-19: राहुल गांधी कोरोना व्हायरस संक्रमित; संपर्कात आलेल्या लोकांनाही Coronavirus चाचणी करण्याचा सल्ला
Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित झाले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi Tests Positive For COVID-19) यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ''राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला कोरोना व्हायरस संसर्गाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. माझी कोरोना व्हायरस चाचणी नुकतीच पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार आपली कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी''. राहुल गांधी यांच्या आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Former Prime Minister Manmohan Singh) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

राहुल गांधी यांच्या आधी माजी पंतप्रधान, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंह (Former Prime Minister Manmohan Singh) यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर मनमोहन सिंह यांना काल (19 एप्रिल) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मनमोहन सिंह हे 88 वर्षांचे आहेत. नुकताच त्यांनी कोरोना लस कोव्हक्सीन (Covaxin) चे दोन डोस घेतले होते. त्यांनंतरही त्यांना कोरोना संक्रमन झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Rahul Gandhi: पश्चिम बंगाल राज्यातील राहुल गांधी यांच्या आयोजित सर्व सभा रद्द, कोरोना व्हयरस संकटामुळे निर्णय)

मनमोहन सिंह यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतर भारतासह जगभरातील अनेक नेत्यांनी त्यांना लवकर बरे व्हावेत अशी भावना व्यक्त केली. यामध्ये राहुल गांधी यांचाही समावेश होता. 'प्रिय मनमोहन सिंह जी आपल्याला लवकर बरे वाटावे. आपल्या मार्गदर्शनाची देशाला गरज आहे', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रकोप वाढतो आहे. अशा स्थितीत केवळ निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय सभा घेणे योग्य होणार नाही. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या आपल्या सर्व सभा नुकत्याच रद्द केल्या होत्या. तसेच, इतर सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही हा कोरोना काळात सभा घेणे योग्य आहे का, याचा विचार करावा असे अवाहनही राहुल गांधी यांनी केले होते.