Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आज मुंबईमध्ये 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू पाठोपाठ आता देशातील सहाव्या बळीची घटना समोर आली आहे. बिहार मध्ये 38 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती कोरोना बाधित होती. मात्र उपचारादरम्यान किडनी फेल्युअरमुळे (Kidney Failure) त्यांचा मृत्यू झाला आहे. पटना येथील एम्स रूग्णालयात काल रात्री त्याचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कोलकत्त्यावरून संबंधित व्यक्ती परतली होती. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेला बिहार येथील एम्स पटना चे डॉ. प्रभात कुमार सिंह यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने होत असला तरीही त्याच्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 3% पर्यंत आहे. यामध्ये वयोवृद्धांना कोरोनाचा अधिक धोका आहे. मात्र 60 वर्षाखालील भारतात मृतांपैकी ही पहिलीच घटना असल्याने आता या आजाराबद्दलचं संकट अधिकच गडद बनत चालली आहे. Coronavirus In Maharashtra: मुंबई मध्ये कोरोना बाधित रूग्णाचा दुसरा बळी; राज्यात COVID 19 पॉझिटिव्हची संख्या 74.  

भारतामध्ये कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ नये म्हणून त्याची साखळी तोडण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' अंतर्गत देशवासियांना सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये संध्याकाळी 5 वाजता नागरिकांनी आपल्या घरात, खिडकीत, बाल्कनीमध्ये एकत्र जमून डॉक्टर, नर्स आणि अन्य सरकारी यंत्रणांच्या अथक मेहनतीला सलाम करण्यासाठी टाळ्यांच्या, शंख, घंटांचा नाद करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

ANI Tweet

भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 341 झाला असून त्यापैकी सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रात 74 रूग्ण असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रूग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता.