Coronavirus Lockdown: ATM मधून पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडावे लागणार नाही,  बँकांनी सुरु केली 'ही' सुविधा
ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारडून लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घरबाहेर पडण्यास मनाई आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे अशा ही सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी घराबाहेर पडता येणार आहे. तर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे गपचुप घरी बसणे हाच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यावरील सर्वात महत्वाचा उपाय असणार आहे. याच पार्श्वभुमीवर बँकांनी नागरिकांसाठी एक नवी सुविधा सुरु केली असून त्यांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी घराबाहेर जावे लागणार नाही आहे. यामध्ये देशातील बड्या बँकांचा समावेश असून त्यांचे एटीएमच तुमच्या घराजवळ येणार आहे.

खरंतर खासगी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या ग्राहकांना लॉकडाउनच्या काळात पैसे काढण्यासाठी एटीएम वॅनची सुविधा सुरु केली आहे. ही एटीएम वॅन काही ठराविक ठिकाणच्या परिसरात उभी राहणार असून नागरिकांना तेथून पैसे काढता येणार आहेत. तसेच सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना या एटीएम व्हॅनच्या मदतीने खात्यामधील पैसे काढता येणार आहे. तसेच नागरिकांना या एटीएमच्या माध्यमातून खात्यातील रक्कम, पैसे ट्रान्सफर, पिन बदलण्याचे ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत. एटीएम व्हॅन कोणत्या ठिकाणी उभी राहणार यासंबंधित निर्णय स्थानिक महापालिकेसोबत ठरवून घेतला जाणार आहे.(Coronavirus Outbreak: कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सर्वात मोठी वाढ; 24 तासात 40 बळी, 1035 जणांना लागण, देशातील रुग्णांचा आकडा 7447 वर) 

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात जे परिसर सील करण्यात आले आहेत तेथे नागरिकांना घरीच थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच येथील नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जात आहेत. देशावर आलेले महाभयंकर संकट दूर करण्यासाठी सरकारकडून विविध नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर काही राज्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन अधिक वाढवावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.