Coronavirus: भारतात कोरोना उद्रेकाचा नवा उच्चांक, पाठिमागील 24 तासात 1027 जणांचा मृत्यू; 1,84,372 जणांना संसर्ग
Coronavirus | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

भारतात गेल्या 24 तासात 1,84,372 नव्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची नोंद झाली आहे. 82,339 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 1,027 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. देशातील एकूण कोविड 19 (Covid 19) संक्रमितांची संख्या आता 1,38,73,825 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,23,36,036 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्यास्थितीत देशात कोरोनाचे 13,65,704 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1,72,085 जणांचा कोरोनामुळे प्राण गेला आहे. देशात 11,11,79,578 नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

भारतात कोरोना व्हायरस संसर्ग वाढतो आहे. त्याच प्रमाणात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांची संख्या वाढते आहे. काल (13 एप्रिल) शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा राज्यात 60, 212 नवे कोरोना सक्रमित आढळून आले आहेत. तर 281 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या 5,93,042 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर सद्या 1.66% इतका आहे. (हेही वाचा, Lockdown in Maharashtra: महाराष्ट्रात संचारबंदी जाहीर होताच स्थलांतरीत कामगार पुन्हा गावी परतण्याच्या मार्गावर)

दरम्यान, महाराष्ट्रात आज (14 एप्रिल) रात्री आठ वाजलेपासून संचारबंदी लागू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह संवादाच्या माध्यमातून काल (13 एप्रिल) ही माहिती दिली. ही कठोर निर्बंधांसह असलेली संचारबंदी म्हणजे एक प्रकारचा लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) असणार आहे. संचारबंदी लागू करण्याचा उद्देशच आहे की नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळले जावे. तसेच, कोरोना चेन ब्रेक व्हावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेल्या संवाधातही तशी माहिती दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करुन कोरोनाची चेन ब्रेक करणं हे एक आव्हान ठरले आहे.