Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 1007 नवे कोरोनाचे रुग्ण तर 23 जणांचा मृत्यू
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

जगभरासह भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर सरकारने लॉकडाउनचे आदेश सुद्धा वाढवले आहेत. याच पार्श्वभुमीवर भारतात गेल्या 24 तासात 1007 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतात कोरोना व्हायरस गेल्या तीन महिन्यांपासून थैमान घालत आहे. तर कोरोनासाठी कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स आणि सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे.

भारतात कोरोना व्हायरसमुळे रुग्ण आणि मृतांचा आकडामधील दर पाहता तो 80-20 दरम्यान आहे. हा दर अन्य काही देशांपेक्षा अधिक असल्याचे लव अगरवाल यांनी म्हटले आहे. सध्या कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी औषध निर्मितीवर अधिक लक्ष असणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 13387 वर पोहचला आहे. तर 432 जणांचा मृत्यू आणि 1749 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी वर्तविली जागतिक महामंदीची शक्यता तर G20 बाबतीत भारताची स्थिती अन्य देशांच्या तुलनेत उत्तम)

सध्या भारत, अमेरिका, फ्रांस, रशिया, युकेसह तब्बल 55 देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करीत आहे. भारतात दरमहा 40 टन हायड्रोक्सीक्लोरोक्विन (HCQ) उत्पादन करण्याची क्षमता आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध मलेरिया व्यतिरिक्त संधिवात आणि ल्युपस सारख्या रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. परंतु अलीकडेच अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियासह बर्‍याच देशांमध्ये हे औषध कोरोना विषाणूवर मात करण्यास सक्षम असल्याचे दिसून आले. तेव्हापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची मागणी परदेशात वाढली आहे.