Coronavirus In Delhi Updates: दिल्लीत गेल्या 24 तासात आणखी 1379 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 1 लाखांच्या पार, सरकारची माहिती
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहेत. तर देशातील बहुतांश भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान आता दिल्लीत (Delhi) गेल्या 24 तासात आणखी 1379 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 1 लाखांच्या पार गेल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दिल्लीत आता कोरोनाबाधितांचा आकडा 1,00,823 वर पोहचला असून त्यामध्ये 72,088 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्याच आला आहे. तसेच 25,620 अॅक्टिव्ह रुग्ण तर 48 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.(Coronavirus: कोरोना व्हायरस रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर; रशियाला टाकले मागे, लवकरच पार करणार 7 लाख रुग्णांचा टप्पा)

दिल्ली सरकारकडून 5327 आरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट आणि 8552 रॅपिड स्टेट आज करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण 6,57, 382 टेस्ट करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.दिल्लीत रविवारी कोरोनाचे 2505 रुग्ण आढळून आले असल्याने आकडा 1 लाखांच्या जवळ पोहचला होता. मात्र आता आणखी नव्याने 1379 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1 लाखांच्या पार गेल्याची माहिती दिल्ली सरकारकडून देण्यात आली आहे. (कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या 'या' महत्त्वाच्या Guidelines)

देशात कोरोनाचे 24,248 रुग्ण आढळले आहेत, तसेच 425 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6,97,413 वर पोहचली आहे. यात 2,53,287 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, 4,24,433 रुग्ण हे डिस्चार्ज मिळवलेले आहेत तर आतापर्यंत 19,693 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत अजूनही महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे.