Rahul Gandhi on Central Government: केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी लढतंय, कोरोनाविरुद्ध नव्हे- राहुल गांधी
Rahul Gandhi | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter) यांच्यात सुरु असलेल्या संघर्षावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार हे कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी विरुद्ध लढत नाही. तर ब्लू टिकसाठी लढते आहे. कोरोना लसीकरणासाठी लोकांकडे आत्मनिर्भर होण्याशिवाय जेव्हा पर्याय नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी रविवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मोदी सरकार ब्यू टिकसाठी लढते आहे आणि जर आपल्याला कोरोना लस हवी असेल तर तुम्हाला आत्मनिर्भर होण्यावाचून पर्याय नाही.' कोरोना महामारीच्या काळात मोदी सरकारचा आग्रक्रम वेगळा आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयद्वारे सोशल मीडियास नव्या नियमांचे पालन करण्याबाबत काढण्यात आलेल्या नव्या नोटीशीनंतर राहुल गांधी यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. सरकारने अमेरिकास्थित मुख्यालय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना भारतीय मापदंडाचे पालन करण्यास सांगितले आहे. या मापदंडांचे पालन न झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही केंद्र सरकारने या कंपन्यांना दिला आहे. केंद्र सरकारने या कंपन्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, 26 मे 2021 मध्ये लागू होणाऱ्या नियमांचे पालन करावे लागेल.

दरम्यान, इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. महाराष्ट्रातूनही मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचेही नाव न घेता हल्ला सढवत म्हटले आहे की, 'चिमणी गिधाडांना भारी पडली!'

केंद्र सरकारने ट्विटरला निर्वाणीचा इशारा देत नवे डिजिटल नियम लागू करण्याबाबत सांगितले आहे. केंद्र सरकारच्या नव्या डजीटल नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना भारतात आपले कार्यालय ठेवावे लागणार आहे. या कार्यालयांचा अधिकृत पत्ता आणि सरकारकडे नोंदणी असावा. याशिवाय या कंपन्यांच्या निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी भारतात असणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे हे अधिकारी भारतीय असावेत असेही बंधन आहे. या नव्या नियमांचे पालन व्हावे यासाठी केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवले आहे. दरम्यान वारंवार सूचना देऊनही ट्विटरकडून या नियमांबाबत पावले टाकण्यात आली नाहीत. परिणामी केंद्र सरकारने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, Central Government On Twitter: नवे डिजिटल नियम लागू करा अन्यथा परिणामांना सामोरे जा; केंद्र सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा)