Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 19,459 जणांना COVID 19 संसर्ग; एकूण संक्रमितांची संख्या 5,48,318
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची आकडा 5,48,318 इतका झाला आहे. गेल्या 24 तासात देशात तब्बल 19,459 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,10,120 इतकी आहे. उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयांतून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्यांची संख्या 3,21,723 इतकी तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 16,475 इतकी आहे.

भारतातील नागरिकांसोबतच सीमा सुरक्षा दलातील जवानांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. सीमा सुरक्षा दिलाने दिलेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलातील 21 जवान गेल्या 24 तासात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 18 जवान उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना संक्रमित 305 जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत 655 जवानांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: भारताच्या 'या' राज्य, केंद्रशासित प्रदेशात आजवर कोरोनामुळे नाही झाला एकही मृत्यू, रुग्णांची संख्याही नियंत्रणात, पाहा संपूर्ण यादी)

दरम्यान, महाराष्ट्राबाबत बोलायचे तर, शेवटची माहिती हातील आली त्यानुसार गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 5493 नवे कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. त्यानुसार राज्यात 70 हजार607 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.59 टक्के एवढे झाले आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.