Corona Vaccination: कोरोना लस उत्पादनाच्या सल्ल्यावर नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण, म्हणाले 'मला तेव्हा कल्पनाच नव्हती'
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

देशात मोठ्या वेगाने कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा असल्याने या लसीकरणाच्या वेगात अडथळा येत आहे. त्यामुळे विदेशातील कंपन्यांची कोरोना लस (Corona Vaccine) आयात करणे, उत्पादन वाढवणे आणि इतर फार्मा कंपन्यांकडूनही कोरोना लसींचा फॉर्म्युला शेअर केला जावा अशी मागणी वाढत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनीही मंगळवारी या मागणीचे समर्थन केले होते. त्यांनी म्हटले होते की, देशात इतर कंपन्यांनाही कोरोनाची लस उत्पादन करण्याचा परवाना मिळायला हवा. परंतू, गडकरी यांनी आपल्याच विधानावर स्वत: स्पष्टीकरण देत ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, काल स्वदेशी जागरण मंचच्या एका कार्यक्रमात मी कोविड लस उत्पादन वाढविण्याचा सल्ला दिला होता. मला तेव्हा माहिती नव्हते की, रसायन व खत निर्मिती मंत्री (Minister of Chemicals and Fertilizers) मनसुख मांडवीय यांनी याबाबत सरकारला माहिती दिली होती. पत्रकार परिषदेनंतर मांडवीय यांनी मला कल्पना दिली की, भारत सरकारने आगोदरच 12 वेगवेगळ्या प्लांट/कंपन्यांनाकडून कोरोना लस उत्पादन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे भविष्यात कोरोना लस उत्पादनात तेजी येण्याची आवश्यता आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, मी जेव्हा कोरोना लस उत्पादन वाढविण्याबाबत सल्ला दिला तेव्हा मला कल्पना नव्हती की आपण असाच निर्णय या आधी घेतला नाही. मला आनंदर आहे की ते आणि त्यांची टीम एकत्रपणे योग्य दिशेने पावले टाकत आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. मला वाटते की ही एक महत्त्वपूर्ण माहिती सामायिक केली जावी. (हेही वाचा, Coronavirus Vaccine: लसीच्या कमतरतेवर नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 1 ऐवजी 10 कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या)

दरम्यान, नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात म्हटले होते की, जर कोरोना लसीकरण उत्पादनाच्या तुलनेत मागणी अधिक असेल तर मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे कोरोना लस उत्पादनासाठी एक दोन कंपन्यावर विसंबून राहम्यापेक्षा 10 पेक्षा अधिक कंपन्यांना फॉर्म्युला शेअर कारावा आणि लस उत्पादन करावे. नितीन गडकरी यांच्यासारखाच सल्ला या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिला होता.