Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतरावरील वादावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Harsh Vardhan | (Photo Credits: Facebook)

कोविशिल्ड (COVISHIELD) लसीच्या दोन डोसमंधील अंतरावरुन निर्माण झालेल्या वाधावर अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांऐवजी 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय वैज्ञानिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारीत आहे. सरकारने 13 मेला म्हटले होते की, कोविड-19 कार्यकारी समितीच्या (COVID-19 Working Group) शिफारशी स्वीकार करुनच असे केल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. नॅशनल टेक्निकल अॅडवाइजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) चे चेअरमन एन के अरोरा यांनीही मंगळवारी म्हटले की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय वैज्ञानिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारीत तसेच पूर्ण पारदर्शी आहे.

एन के अरोरा यांनी म्हटले आहे की, COVID-19 Working कमेटीच्या बैठकीत दोन डोसमधील अंतर वाढविण्यावरुन कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. सर्व संमतीनेच हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने ट्विटमधून माहिती दिली आहे की, सराकरने समितीद्वारा करण्यात आलेल्या शिफारशींचा स्वीकार करुनच केंद्र शासीत प्रदेश आणि घटक राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाची लस कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. (हेही वाचा, Covishield: कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर परस्परच दुप्पट? भारतीय वैज्ञानिकांच्या गंभीर दाव्यामुळे प्रश्नचिन्ह)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या दोन्हीड डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय पूर्णपणे वैज्ञानीक आकडे आणि आधारावर पारदर्शीपणे घेतला आहे. भारतात अशा प्रकारचा आरोग्य डेटा तपासण्याचे चांगले तंत्र विकसीत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे की, सर्व गोष्टींचे राजकारण केले जात आहे.