गोव्यात काँग्रेसला बसणार मोठा धक्का, NCP कडून TMC सोबत गठबंधन करण्याची तयारी
NCP | Photo Credits: Facebook)

गोव्यात (Goa) काँग्रेस (Congress) पक्षाला एनसीपीकडून (NCP) मोठा धक्का दिला जाणार आहे. कारण एनसीपी नेत्यांचा एक गट ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टीसह गोव्याततिसऱ्या आघाडीसाठी चर्चेची वकिली करत आहेत. एनसीपीचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी AICC प्रभारी दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम आणि GPCC नेत्यांना युतीच्या परिस्थितीबद्दल त्यांच्या पक्षाची नाराजी सांगितली आहे. काँग्रेसचा काळ संपत चालला आहे, असे पटेल यांनी म्हटले आहे.

एनसीपीच्या एका नेत्याने असे म्हटले की, आम्ही ऐकले गोव्यात काँग्रेस नेते आपल्या निवडणूकीच्या रणनितीवरुन भांडण करत आहेत. तर एआयसीसी आता पर्यंत ते सोडवण्यात असमर्थ ठरले आहेत. राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली असून आम्ही अंतहीन प्रतीक्षा करु शकत नाही. पक्षाचे आमदार चर्चिल अलेमाओ यांच्यासह गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या एका गटाने टीएमसीसह गठबंधन करण्यासंबंधित चर्चा सुरु केली आहे. त्यांनी जोर देत म्हटले की, शरद पवार भाजप आणि बिगर-काँग्रेस विरोधी तिसरी आघाडी सुरू करू शकतात ज्यात TMC, AAP, NCP आणि इतरांचा समावेश असेल.(पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास महिलेला महिन्याला 1,000 रुपये देऊ, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा)

राव यांनी नुकतेच म्हटले होते की, काँग्रेस एनसीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्र गोमांतक पार्टीसह गठबंधनाची बातचीत करणार आहेत. मात्र गोव्यात काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते एनसीपी आणि जीएफपीसह (गोवा फॉरवर्ड पार्टी) व महाराष्ट्र गोमांतक पर्टी (एमजीपी) सोबत गठबंधन बद्दल बातचीत करतील. परंतु गोव्यात काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते एनसीपी आणि जीएफपीसोबतच्या गठबंधनामुळे विभागले गेले आहेत. काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीला विरोध करणाऱ्यांचे मत होते की, काँग्रेस आपल्या बळावर उत्तम प्रदर्शन करण्यासाठी मजबूत आहे.