Amritsar Train Tragedy : रेल्वेला क्लीन चीट,  रुळावर उभी राहणारी लोकं अपघाताला जबाबदार -CCRS चा अहवाल
अमृतसर ट्रेन अपघात Phot credit: (Photo Credit-PTI)

Amritsar train tragedy: दसऱ्याच्या संध्याकाळी अमृतसरमध्ये रावणदहनाचा कार्यक्रम दरम्यान झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीमध्ये रेल्वेला क्लीन चीट देण्यात आली आहे. रुळावर उभ्या असलेल्या ६१ लोकांना ट्रेनने उडवल्यानंतर रेल्वे प्रशासनाला या अपघातामध्ये दोषी ठेवण्याचा प्रयत्न होता. मात्र Chief Commissioner of Railway Safety (CCRS) ने दिलेल्या अहवालानुसार यामध्ये रेल्वेला क्लीन चीट देण्यात आली आहे.

रावण दहनाच्या कार्यक्रमामध्ये धोबी घाट परिसरातील गर्दी रुळांवर आली होती. दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रेन खाली चिरडून ६१ लोकांचा जीव गेला लोक १४३ जखमी झाले होते. CCRS च्या मते, रेल्वे ट्रॅकवरवर उभ राहणं ही संबंधित लोकांची चूक होती. तसेच चौकशी अहवालामध्ये, भविष्यात मोठ्या स्वरूपात कार्यक्रामाचे आयोजन केले असल्यास त्याबाबतची माहिती संबंधित रेल्वे प्रशासनाला देणं गरजेचं असल्याची सूचना देखील करण्यात आली आहे.

१९ ऑक्टोबरच्या रात्री अमृतसरमध्ये जोधा फाटक परिसरामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावणाची भव्य मूर्ती जळताना पाहण्यासाठी हजाराहून अधिक लोक जमले होते. मात्र ही गर्दी केवळ मैदानावर न राहता रुळावरही उभी होती.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जलंधर-अमृतसर डीएमयूच्या काही मिनिटांपूर्वी अमृतसर-हावड़ा ट्रेन गेली होती. तेव्हा एका बाजूने आलेल्या जलंधर-अमृतसर डीएमयू रेल्वेखाली चिरडून लोकांचा नाहक बळी गेला. दोन्ही बाजूनी ट्रेन नसल्याने मोठा अनर्थ टाळला अन्यथा मृतांची संख्या अधिक असली असती.