Chhattisgarh Horror: छत्तीसगडमध्ये तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; 15 वर्षीय मुलाला अटक, गुन्हा दाखल
Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 15 वर्षाच्या मुलाने तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार (Rape) केला. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर मुलीची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी कसेबसे तिला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

18 मार्च रोजी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पीडितेचे कुटुंब आरोपीच्या घरात भाड्याने राहत होते. ही घटना बिलासपूरच्या सिरगीट्टी भागातील बन्नक चौकात घडली.

पोलिसांनी सांगितले की, 17 मार्चला सायंकाळी पिडीत मुलीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या अल्पवयीन मुलीवर 15 वर्षांच्या मुलाने बलात्कार केला आहे. कुटुंब मूळचे मुंगेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. पिडीत मुलीचे वडील इथे चालवतात. मुलीच्या आईने सांगितले की 17 मार्च रोजी संध्याका त्यांची मुलगी घराजवळ खेळत होती. काही वेळाने ती दिसली नाही. मुलीचा आजूबाजूला शोध घेतला मात्र ती सापडली नाही. (हेही वाचा: UP Shocker: अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत कोचिंग सेंटरच्या संचालकाचे प्रेमसंबंध; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर केली हत्या)

त्यावेळी कोणीतरी सांगितले की ती, शेजारच्या 15 वर्षाच्या मुलासोबत खेळत होती. तो मुलगा तिला बाथरूमच्या दिशेने घेऊन गेला होता. त्यानंतर महिला शेजाऱ्यांसोबत बाथरूममध्ये गेली. तेव्हा बाथरूमचे दार आतून बंद होते. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा तोडला, जेव्हा मुलगा आणि ही अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये असल्याचे दिसले. मुलगी जमिनीवर बेशुद्ध पडली होती. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोस्टमॉर्टमनंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. शवविच्छेदनात मयत मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या असून शरीरावर नखे व चाव्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. बलात्कारानंतर मुलीने आरडाओरडा केल्यावर आरोपीने दाताने चावा घेत तिची हत्या केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.