केमिस्ट स्टाईक (photo Credits: Pixabay )

ऑनलाईन फार्मसी विरोधात 28 सप्टेंबरला बंद जाहीर करण्यात आला आहे. देशभरात हा बंद पाळला जाणार असल्याने रूग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बंदामुळे 28 सप्टेंबरला सर्व मेडिकल स्टोअर्स 24  तास बंद राहणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज व्हायरल

देशामध्ये फार्मसी बंद पाळला जाणार असल्याने घरात ब्लड प्रेशर, शुगर ( डाएबेटीस ) आणि अत्यावश्यक औषधं आगाऊ विकत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर काही मेसेज शेअर केले जात आहेत.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट एन्ड ड्रगिस्टच्या आवाहानानुसार ई फार्मेसीच्या विरोधात देशभरात दुकानं बंद ठेवली जाणार आहेत.

कधी असेल संप

देशभरात चालणारा फार्मसी संप २७ तारखेला रात्री बारा वाजल्यापासून २८ ला रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील.