चंदीगढ येथे एका ग्राहकाला कोल्ड्रिंगच्या बॉटलमध्ये किडा सापडल्याने कंपनाला तब्बल 5 लाख रुपयांचा भुर्दंड राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने ठोठावला आहे. खरेदी केलेल्या बॉटलमध्ये मृत किडा आढळून आल्याने ग्राहकाने याबाबत कंज्यूमर फोरममध्ये तक्रार दाखल केली. परंतु कंज्युमर फोरम यांनी या गोष्टीकडे कानाडोळा करत ती फेटाळून लावली. ग्राहकाने राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग यांच्याकडे धाव घेत याबाबत सांगितले. तर ग्राहकाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत कंपनीला भला मोठा दंड ठोठावला आहे.
पेप्सिको कंपनीच्या माउंटन ड्यू मध्ये ग्राहकाला मृत किडा सापडला. यााबबत त्याने तक्रार दाखल केली. ग्राहकाच्या वकिलाने या प्रकरणी असे म्हटले आहे की, कंपनीला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ग्राहकाला झालेल्या नुकसानाबाबत त्याला 60 हजार रक्कम रुपये आणि केसच्या खर्चासाठी 25 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही ज्या दुकानामधून माउंटन ड्यू खरेदी केले होते त्या दुकानदाराने 35 रुपये ग्राहकाला परत देण्यास सांगितले आहेत.(देशात तेलबियांचा पेरा घटला; कांदा, बटाट्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 20 रुपयांची वाढ)
तर ग्राहक नवीन सेठी यांनी 2015 मध्ये माउंट ड्यूची बॉटल खरेदी केल्यानंतर त्यात मृत किडा आढळून आला होता. तक्रार केल्यानंतर बॉटल उत्पादन तारखेच्या एक वर्षानंतर पाठवण्यात आल्याचे ग्राहक मंचाने स्पष्ट केले. तपासणी नंतर बॉटलमधील गोष्ट आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगण्यात आल्यानंतरही ग्राहक मंचाने ग्राहकाची तक्रार फेटाळून लावली होती. मात्र यावर पेप्सिको कंपनीने स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, काही उत्पादक बनावट कोल्ड्रिंग बनवून ते कंपनीच्या नावे विकले जातात.