लखनौ: लग्नासाठी निघालेल्या गाडीने घेतला पेट; आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

आग्रा - लखनऊ एक्सप्रेस वेवर (Agra - Lucknow Expressway)  रविवारी 16  फेब्रुवारी रात्री उशिरा एका चारचाकी गाडी आणि ट्रक मध्ये धडक होऊन अपघात घडला. या अपघातानंतर गाडीने अचानक पेट घेतला, आणि याच आगीत गाडीतील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गाडीला आग लागताच अगडीटेल प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी ही मंडळी जोरजोरात किंचाळत ओरडत सुद्धा होती, मात्र आगीचे स्वरूप इतके भीषण होते की कोणालाही त्यांना मदत करणे शक्य झाले नाही त्यामुळे रस्त्यावर उपस्थित अन्य बघ्यांच्या गर्दीतच या सात जणांचा आगीत जाळून मृत्यू झाला आहे. आगरा-लखनौ एक्सप्रेस वे येथे ट्रक-बसचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री आग्रा - लखनऊ एक्सप्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ हा अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की ट्रकचा पुढचा भाग गाडीमध्ये घुसला होता. गाडीचा चालकही गाडीबाहेर पडण्यात आणि स्वत:ला वाचवण्यात अपयशी ठरला आणि ड्रायव्हर सकट या आगीत सात जणांचा जाळून मृत्यू झाला. गाडीतून प्रवास करणारे सातही जण शाहजहांपूरमध्ये एका लग्नात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पोलिसांनी गाडी क्रमांकाची चौकशी केल्यानंतर ही गाडी अंकित वाजपेयी नामक व्यक्तीची असल्याचे समोर आले.

तूर्तास पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. सध्या पोलिसांना प्राप्त माहितीनुसार, ही गाडी एलपीजीवर सुरू होती. महत्त्वाचं म्हणजे, चार चाकी गाड्यांमध्ये एलपीजी किट बॅन आहे. तसेच गाडीच्या रजिस्ट्रेशन पेपरवर ही गाडी पेट्रोलवर चालणारी गाडी म्हणून नमूद आहे. याचाच अर्थ ही गाडी अवैधरित्या एलपीजी सिलिंडरवर सुरू होती. या एलपीजीच्या स्फोटामुळेच ही आग आणखीन भीषण झाली असणार असे पोलिसांचे म्हणणे आहे.