BSNL कर्मचारी संघटनांचा बेमुदत संपाचा इशारा, सरकार Reliance Jio ला संरक्षण देत असल्याचा आरोप
BSNL (Photo Credit: Livemint)

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओचा  (Reliance Jio) प्रवेश झाल्यापासून खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातही अनेक समीकरणं बदलल्याचं चित्र मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. बीएसएनएल ( Employee Unions Of BSNL ) कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी रिलायन्स जिओला  (Reliance Jio) जबाबदार ठरवत आता बेमुदत संपाचं शस्त्र उपसलं आहे. बीएसएनएल कर्मचारी संघटना 3 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत.

इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेमध्ये सरकार जिओला संरक्षण देत असल्याचा आरोप बीएसएनएल कर्मचारी संघटनांनी केला आहे. जिओसोबत स्पर्धा टाळण्यासाठी बीएसएनएल   (BSNL ) ला 4G सेवेचे स्पेक्ट्रम दिले नसल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. संघटनांच्या या आरोपांवर रिलायन्स जिओने अद्यात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बीएसएनएलच्या संघटनांनी जाहीर केलेल्या निवेदनामध्ये केवळ पैशाच्या ताकदीवर रिलायंस जिओ गुंतवणुकीपेक्षा कमी दरामध्ये सेवा देत आहे असा आरोप केला आहे. रिलायंस जिओला बीएसएनएलसह इतर प्रतिस्पर्धांना संपवण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खासजी क्षेत्रामध्ये टाटा टेलिसर्व्हिस (Tata Teleservices) , टेलिनॉर,एअरसेल (Aircel) यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. काही दिवसांपूर्वी व्होडाफोन (Vodafone) आणि आयडिया(Idea)  या कंपनीने टाय अप केले आहे.