जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका, ब्रिटिश खासदार डेबी अब्राहम यांची दिल्ली विमानतळावरुनच पाठवणी
Debbie Abrahams (Photo Credits-Twitter)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयाची घोषणा मोदी सरकारने केली. या निर्णयाच्या विरोधात जगातील काही देशांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले. भारत दौऱ्यावर युरोपियन युनियनचे काही खासदारांनी जम्मू-कश्मीर येथे भेट दिली. परंतु सोमवारी ब्रिटेनच्या लेबर पार्टी मधील खासदार डेबी अब्राहम(Debbie Abraham) यांना दिल्ली विमानतळावरुनच पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले. यावर आता डेबी अब्राहम यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी डेबी यांनी जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली होती.

डेबी अब्राहम या खासदार आणि ऑल पार्टी पार्लिमेंट्री ग्रुप ऑफ कश्मीरच्या अध्यक्षा आहेत. सोमवारी सकाळच्या वेळेस डेबी या दिल्लीच्या विमानतळावर पोहचल्या. त्यावेळी त्यांना त्यांचा व्हिजा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच व्हिजा ऑक्टोबर 2020 पर्यंत मान्य होता असे ही सांगितले गेले. यावर डेबी यांनी त्यांनी ई-व्हिजासह कागदपत्र सुद्धा दाखवले. पण विमातळावरील अधिकाऱ्यांनी ते अमान्य केले. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबी यांना त्यांचा व्हिजा रद्द करण्यात आल्याची सुचना देण्यात आल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधी विमानतळावर डेबी आल्या त्यावेळी त्यांच्याकडे व्हिजा नव्हता.(डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत कार्यक्रमाचे नाव आता 'केम छो' नाही, 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' होणार; सरकारची घोषणा)

तर डेबी यांनी ट्वीट करत त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार केली आहे. भारतामधील काही नातेवाईंकाना भेटण्यासाठी जात होती. माझ्यासोबत काही भारतीय स्टाफ मेंबर्स सुद्धा होते. मी ह्युमन राईट्ससाठी आवाज उठवत आहे. मी माझ्या सरकारच्या विरोधात या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करणार.