अमृतसर ग्रेनेड हल्ला: मृतांच्या नातलगांना 5 लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Photo Credits: ANI)

अमृतसरच्या राजासांसी परिसरातील निरंकारी भवनावर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ही मदत जाहीर केली असून जखमींवर मोफत उपचार होतील, असेही त्यांनी सांगितले.

दर रविवारप्रमाणे आजही निरंकारी भवनावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनेड फेकले. यावेळी झालेल्या हल्ल्यात 3 जण ठार झाले तर 10-15 जण जखमी झाले. स्फोटानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यानंतर अमृतसर, नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोट शहरांमध्ये अलर्ट लागू करण्यात आला आहे. तसंच या हल्ल्याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. अमृतसरमधील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तिघांचा मृत्यू, दहाजण जखमी

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये जैश-ए-मोहम्मदचे 6-7 घुसल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. लवकरच ते राजधानी दिल्लीत घुसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती समोर येत आहे.