Ram Swaroop Sharma Death: भाजप खासदार राम स्वरुप शर्मा यांचा मृत्यू, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याची चर्चा
BJP MP Ram Swaroop Sharma (Photo Credits: Twitter/ANI)

भाजप खासदार राम स्वरुप शर्मा (BJP MP Ram Swaroop Sharma) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ते 62 वर्षांचे आहेत. दिल्ली येथील आरएमएल हॉस्पीटल परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये राम स्वरुप शर्मा यांचे गोमती अपार्टमेंटमध्ये (Gomti Apartments ) निवासस्थान आहे. याच निवासस्थानात खोली क्रमांक 204 मध्ये राम स्वरुप शर्मा यांचा मृतदेह फासाला लटकत असल्याचे पुढे आहे. राम स्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. परंतू, त्यास अद्याप पुष्टी मिळू शकली नाही. शर्मा यांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यमागे आणखी काही कारण आहे? याबात अद्याप स्पष्टता नाही. दिल्ली पोलीस (Delhi Police) अधिक तपास करत आहेत.

खासदार राम स्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेश राज्यातील मंडील लोकसभा मतदारसंघातून भाजप तिकीटावर सलग दोन वेळा निवडूण आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8.30 च्या सुमारास माहिती मिळाली की खासदार राम स्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केली आहे. आरएमएल रुग्णालयानजिक असलेल्या गोमती आपार्टमेंट (एमपी फ्लैट) मध्ये शर्मा यांनी आत्महत्या केली. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा राम स्वरुप शर्मा यांचा मृतदेह फासाला लटकत असल्याचे पाहायला मिळाले. आत्महत्येचे कारण पुढे येऊ शकले नाही. (हेही वाचा, Mohan Delkar Suicide Case Update: दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार- अनिल देशमुख)

खासदार राम स्वरुप शर्मा यांच्या निधनानंतर भाजपची आज होणारी संसदीय बैठकही रद्द करण्यात आली आहे.