काय सांगता? भाजप मंत्री Brajendra Pratap Singh यांचा हरवलेला चष्मा चक्क महिला उमेदवाराच्या केसात; Congress ने चढवला हल्ला (Watch Video)

काँग्रेस या घटनेला एका मंत्र्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचे म्हणत आहे

Brajendra Pratap Singh (Photo Credit : Twitter)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सतनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह (Minister Brajendra Pratap Singh) स्टेजवर उपस्थित महिला उमेदवाराच्या केसातून आपला चष्मा काढत असल्याचे दिसत आहेत. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आता काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस ही बाब महिलांच्या सुरक्षेशी जोडत आहे व एका महिलेच्या विनयभंगाचे हे प्रकरण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ सतनाच्या रायगाव विधानसभा सीटच्या बैठकीचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुख्यमंत्री शिवराज मंचावर बसलेल्या नेत्यांची आणि पाहुण्यांची नावे सांगत आहेत. या दरम्यान मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह आपला चष्मा शोधत असल्याचे दिसत आहे. ते आजूबाजूला चष्मा शोधत असताना, त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती तो चष्मा समोर उभा असलेल्या महिला उमेदवाराच्या केसात अडकल्याचे दाखवतात. त्यानंतर सिंह पुढचा मागचा कसलाही विचार न करता, हळूच त्या महिलेच्या केसात अडकलेला चष्मा काढून घेतात.'

ही घटना रविवारी घडली. हा चष्मा परत मिळवण्यासाठी स्वतः महिलेच्या केसांना हात लावण्याऐवजी सिंह त्या महिला उमेदवाराला विनंती करू शकले असते, असे सोशल मिडियावर बोलले जात आहे. याचवेळी ब्रिजेंद्र प्रताप सिंह यांचे अजून एक अशोभनीय वर्तन समोर आले आहे. शिवराज सिंह चौहान मंचावरून भाषण देत असताना, खनिज मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह आणि भाजपच्या उमेदवार प्रतिमा बागरी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिमा बागरी ब्रिजेंद्रसिंह यादव यांच्या शेजारी बसल्या होत्या. त्यावेळी मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह यांनी बागरी यांच्या गुडघ्यावर हात ठेवला. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. (हेही वाचा: Viral Video: थुंकी लावून तंदुरी रोटी बनवत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस, आरोपीला अटक)

या व्हिडिओसंदर्भात काँग्रेस शिवराज सरकारवर हल्ला करत आहे. काँग्रेस या घटनेला एका मंत्र्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचे म्हणत आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये कॉंग्रेसने म्हटले आहे- ‘निर्लज्ज भाजप. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशचे मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह रायगांव येथील भाजप उमेदवाराची छेड काढत आहेत. शिवराज साहेब, मुली कशा सुरक्षित राहतील? B- बेशर्म J- जयचंद P- पार्टी.’



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif