Lockdown: भाजप नेत्याची राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या
Pistols | (Photo Credits: IANS)

उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) येथे एका भाजप (BJP) नेत्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यूनुस अहमद डंपी (Yunus Ahmad Dumpy) असे या नेत्याचे नाव आहे. ते भाजप अल्पसंख्याक मोर्चा (BJP Alpsankhyak Morcha) संघटनेचे शहर उपाध्यक्ष असल्याचे समजते. बरेली शहरात लॉकडाऊन (Lockdown) असताना ते आपल्या घराबाहेर बसले होते. दरम्यान, आज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडू हत्या केली.

यूनुस अहमद डंपी यांची गोळ्या घालून हत्या झाल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, डंपी यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर हातातील बंदूक हातात नाचवत शहरातील रस्त्यांवरुन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तापस सुरु केला आहे.

दरम्यान, यूनुस अहमद डंपी यांच्या हत्येला जमीन व्यवहार आणि जमिनीबाबतचा वाद कारणीभुत असल्याचे सांगण्यात येत आहे. यूनुस अहमद यांचा काही लोकांशी जमीनीच्या व्यवहारावरुन वाद होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे. युनुस यांच्या कुटुंबीयांनी चार जणांवर आरोप केला आहे. हे चार लोक हत्येस कारणीभूत असल्याचा दावा यूनुस यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. (हेही वाचा, Lockdown: बायकोला भेटण्यासाठी मारली सायकलवर टांग; उत्तर प्रदेश ते बिहार 600 किलोमीटरचा प्रवास, भलेभलेही अवाक)

आयएएनएस

एसपी शैलेश कुमार पांडे यांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करुन त्यांन अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अश्वासन दिले आहे की, युनूस अहमद डंपी यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल.