Delhi-Bhagalpur Express मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, प्रवाशांकडून लुटले 25 लाख
Representational Image | Indian Railways (Photo Credits: ANI)

Delhi-Bhagalpur Express: दिल्ली- भागलपूर एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी धुमाकुळ घालत प्रवाशांकडून तब्बल 25 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. तसेच प्रवाशांना दरोडेखोरांनी धारधार शस्र आणि बंदुकीचा धाक दाखवत हा डल्ला टाकल्याचे सांगितले जात आहे.

लखीसराई जिल्ह्यातील धनौरी काजरा भागात ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी भगलपूर येथे जाणाऱ्या एक्सप्रेसची आपत्कालीन चैन ओढून एका सामसुम ठिकाणी ही ट्रेन थांबिवली. त्यानंतर दरोडेखोरांनी रेल्वेमध्ये घुसुन प्रवाशांना त्यांच्याजवळील हत्यारांचा धाक दाखवत लाखो रुपये आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. तर काही प्रवाशांनी दरोडेखोरांना विरोध केला असता त्यांच्यावर चाकू हल्ला आणि एक्सप्रेसमध्ये गोळीबार करण्यात आला. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी एक्सप्रेस पुन्हा पूर्ववत होऊन जमालपूरच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील पोलिसांना या घटनेबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरु झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.