भोपाळ: लग्नाआधी टॉयलेट सेल्फी दाखवून मिळणार 51,000; 'हा' हटके नियम नेमका आहे तरी काय?
Image For Representation (Photo Credits: File Image, Pixabay)

लग्नाआधी प्री वेडिंग शूट चे फॅड तर तुम्हाला ठाऊकच असेल पण मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal)  मध्ये लग्नाआधी मुलांना चक्क त्यांच्या घरातील शौचालयात उभे राहून सेल्फी काढण्यास सांगितले आहे. हा सेल्फी दाखवून मुलांना 51 हजार मिळवता येणार आहेत. वास्तविक झालं असं की, मध्य प्रदेश सरकारने 2013 मध्ये मागास वर्गीयांसाठी मुख्यमंत्री विवाह/निकाह योजना जाहीर करण्यात आली होती, याअंतर्गत विवाहइच्छुक जोडप्यांना सरकरकडून 51,000 रुपये मिळण्याची तरतूद होती, यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असून संबंधित मुलाच्या घरी शौचालय असणे अनिवार्य होते.

गुगल मॅप दाखवणार युजर्सला Public Toilet चा मार्ग

प्राप्त माहितीनुसार,भोपाळ मध्ये अलीकडेच 74 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये या नियमाची घोषणा करण्यात आली. यानुसार, होणाऱ्या नवऱ्याने त्याचा शौचालयाच्या सोबत 'सेल्फी' काढून तो लाभार्थी अर्जाला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाला अनेक तरुणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण जर का शौचालयाचा पुरावा दाखवला नाही तर तुमचे लग्न होणार नाही असे सांगून त्यांना या नियमाचे पालन करण्यास गळ घातल्याचे 'मटा'ने म्हंटले आहे. यापूर्वी लग्नानंतर कमीतकमी 30 दिवसात शौचालय बांधण्याची मुभा देण्यात आली होती मात्र आता लग्नाच्या आधीच ही सोय तयार करून त्याचा पुरावा देण्यासाठी टॉयलेट सेल्फी हा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

लग्नकार्यासाठी सरकारचे 6 कडक कायदे; नियम मोडल्यास थेट तुरुंगात होईल रवानगी

दरम्यान, या योजनेशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी याबाबत मत व्यक्त करताना संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलांनी पाठवलेली सेल्फी ही केवळ पुरावा आहे तो काही तुमच्या लग्नपत्रिकेचा भाग नाही त्यामुळे यात काही गैर नसल्याचे काहींचे सांगणे आहे तर हा उपक्रम उत्तम असला तरी याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते असे मत भोपाळमधील काँग्रेस नगरसेवक रफीक कुरेशी यांनी मांडले आहे.