Student Stabs Teacher (फोटो सौजन्य - X/@news24tvchannel)

Student Stabs Teacher: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइच जिल्ह्यातून (Bahraich District) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकावर चाकूने प्राणघातक हल्ला (Student Stabs Teacher) केला. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. शिक्षकाने वर्गात मोबाईल वापरण्यास मनाई केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले होते, याच रागातून विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केला. हे प्रकरण मिहीनपुरवा मोतीपूर परिसरात असलेल्या नवयुग इंटर कॉलेजचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वी इयत्ता 11वीचे तीन विद्यार्थी वर्गात मोबाईल फोन वापरत होते. शिक्षक राजेंद्र वर्मा यांनी तीन विद्यार्थ्यांना मोबाईल वापरताना पाहिले होते. त्यानंतर शिक्षकाने त्याचा फोन जप्त केला. त्यानंतर शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाईल परत करण्यात आले. शिक्षकाने मोबाईल जप्त केल्याने यातील एक विद्यार्थी संतप्त झाला आणि त्याने शिक्षक राजेंद्र वर्मा यांच्यावर सूड उगवला. (हेही वाचा -Assam Student Stabs Teacher to Death: कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकची हत्या, अल्पवयीन विद्यार्थ्याला अटक, आसाम येथील धक्कादायक प्रकार)

गुरुवारी विद्यार्थी हातात चाकू घेऊन आला. सकाळी शिक्षक हजेरी घेत होते. त्यानंतर संधी साधून विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केला. त्याने एकापाठोपाठ अनेक वेळा हल्ले केले. विद्यार्थ्याने शिक्षकाला धक्काबुक्की करताच संपूर्ण वर्गात एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यात शिक्षकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिक्षकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून प्राथमिक उपचारानंतर शिक्षकाला गंभीर अवस्थेत बहराइच मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा - Teacher Murdered on School Campus: लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने महिला शिक्षकाची शाळेतच हत्या; तामिळनाडू येथील घटना)

सध्या शिक्षकावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या हल्याची पोलिसांना माहिती देण्यात आली. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून हल्ला करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन विद्यार्थी शिक्षकाकडे जाताना दिसत आहेत.