मास्क घालायला सांगितले म्हणुन हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडून महिलेला मारहाण, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला धक्कादायक प्रकार (Watch Video)
Man Caught Beating Women In Hotel (Photo Credits: ANI)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) च्या पर्यटन विभागांतर्गत नेल्लोर (Nellore) येथील हॉटेल मधील  एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.  ज्यात एक कर्मचारी रागाच्या आवेशात एका सहकारी महिलेला निर्घृणपणे मारहाण (Man Beating Women) करत आहे. या मागील कारण असे की या महिलेने या व्यक्तीला मास्क घालण्यास सांगितले होते.  ANI च्या  माहितीनुसार, ही घटना 27 जून ला घडली असून आता त्याचा व्हिडीओ (Viral Video) सुद्धा समोर येत आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.  पोलीस यामध्ये चौकशी करून पुढील तपास करतील असं सांगण्यात आले आहे.

मुंबई: सरकारी हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्याला 30 वर्षीय वार्ड बॉयला अटक

ANI च्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, हा व्यक्ती महिलेला हाताने जोरजोरात फटकारत आहे, यात अन्य कर्मचारी या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करतात मात्र कोणाचेही न ऐकता तो मारताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये आणखीन एक महिला आहे जी हा सगळा प्रकार बघून बाजूने निघून जात आहे. या मारहाण करणाऱ्या व्यक्ती सोबतच नेटकरी या महिलेच्या भूमिकेवर सुद्धा टीका करत आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, महिलांवरील अत्याचार हा नेहमीच चर्चेत असणारा मुद्दा आहे. अलीकडेच मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एका 30 वर्षीय वार्ड बॉय ला अटक करण्यात आली आहे.