भारतीय वायु सेनेच्या बेपत्ता AN-32 Aircraft चे अवशेष मिळाले, 13 प्रवाशांचा शोध सुरु
IAF AN-32 Aircraft (Photo Credits: PTI) | Image Used For Representational Purpose

असम येथील जोरहाट एअरबेस येथून अरुणाचल प्रदेश राज्यातील मेन्चुका च्या दिशेने झेपावलेल्या AN-32 Aircraft चा शोध लागला. भारतीय वायुसेनेचं असलेले हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे प्रथमदर्शनी वृत्त आहे. या विमानाचे अवशेष बर्फाळ प्रदेशात आढळ्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तसेच, AN-32 Aircraft चे अवशेष IAF ने शोध मोहिमेवर पाठवलेल्या विमानांनाच सापडल्याचेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, विमानाचे अवशेष सापडले असले तरी, विमानांतील प्रवाशांचा शोध अद्यापही सुरु आहे. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी आईएएफने आपली सुखोई -30 आणि सी - 130 विमानं पाचारण केली होती.

भारतीय वायू सेना (Indian Air Force) विमान ए एन 32 हे गेली तीन तास बेपत्ता असल्याचे वृत्त होते. हे वृत्त खरे ठरले असून, विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार या विमानात एकूण 13 लोक आहेत. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर या विमानाचा रडार सोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झालं होतं.

प्राप्त माहितीनुसारह, या विमानात वैमानिक पथकाचे 8 सदस्य आणि 5 प्रवासी आहेत. या विमानानं असम येथील जोरहाट येथून उड्डाण घेतलं. या विमानानं दुपारी 12. 25 मिनिटांनी जोरहाट एअरबेस येथून उड्डान घेतले होते. (संदर्भासाठी हे वाचा, भारतीय वायू सेनेचं AN-32 Aircraft बेपत्ता, विमानाच्या शोधासाठी इंडियन एअर फोर्सची सुखोई -30, सी - 130 रवाना)

विमानाने उड्डाण घेतल्यापासून साधारण दुपारी एक वाजलेपासून त्याचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचा रडारसोबत संपर्क तुटल्याला सुमारे अडीच तास उलटून गेले. त्यामुळे विमानाचा शोध घेण्यासाठी आईएएफने आपली सुखोई -30 आणि सी - 130 विमानं पाचारण केली होती.