केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डीपफेक व्हिडीओ (Amit Shah Doctored Video) शेअर केल्याप्रकरणी झारखंड काँग्रेसचं (Jharkhand Congress) X अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. झारखंड काँग्रेसचे अधयक्ष राजेश ठाकूर यांना बनावट व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेलकडून या प्रकरणी 28 एप्रिल दिवशी एक प्रकरण दाखल केले आहे. दरम्यान राजेश ठाकूर यांना दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं.

सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाजप निवडणूका जिंकल्यानंतर SC, ST यांचं आरक्षण संपवणार असा दावा केला जात आहे. मात्र शेअर होत असलेला हा व्हिडीओ एडिट करुन व्हायरल केला जात असल्याची बाब समोर आलीआहे. हा व्हिडीओ 2023 मधील तेलंगणा येथील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाषणामध्ये मुस्लिम कोटा संपवण्याबद्दल बोलत होते.

आता X कडून कारवाई करत झारखंड कॉंग्रेसचे अकाऊंट बंद केले आए. त्याबाबत बोलताना एक्स ने दिलेल्या माहितीनुसार, X च्या वतीने, असे सांगण्यात आले आहे की कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून, झारखंड काँग्रेसचे हँडल X वरून बंद करण्यात आले आहे. सध्या या हँडलवरून कोणतेही ट्विट करता येणार नाही. या हँडलवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 'डीपफेक व्हिडिओ' पोस्ट करण्यात आला होता.

झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना 'मला मंगळवारी (30 एप्रिल) दिल्ली पोलिसांकडून नोटीस मिळाली. मात्र, मला नोटीस का बजावण्यात आली हे समजू शकलेले नाही. हे अराजकतेशिवाय दुसरे काही नाही.'